विज्ञापन

ईद-ए-मिलाद निमित्त कदिम जालना पोलीस ठाण्यात घेण्यात आली बैठक

img-20230930-wa00558577825809200475762

मिरवणुकी दरम्यान पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त..

मिरवणुकीत झेंडे लावून फिरणाऱ्या दुचाकी स्वरांवर पोलिसांची खास नजर..

जालना शहरातील ईद उल मिलादीन्नबी आणि गणेश विसर्जन दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने ईद ए मिलाद चा जुलूस दोन दिवसा नंतर म्हणजेच रविवारी काढण्याचा मुस्लिम समाजातील धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्त्याःनी घेतला होता.त्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये आज शनिवारी मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी दरम्यान बैठक बोलवण्यात आली होती.

या बैठकी दरम्यान पोलिसांच्या वतीने समाज बांधवांना काही सूचना सुद्धा देण्यात आले आहे. मिरवणुकी दरम्यान जे समाज बांधव आपल्या दुचाकी वर मोठ मोठे झेंडे घेऊन मिरवणुकीत सहभाग घेतात त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे मिरवणुकीमध्ये दुचाकीवरून चालताना मोठ मोठे झेंडे लावू नये जेणेकरून कोणाचाही अपघात घडेल व जीवितास इजा पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही, त्यामुळे पोलिसांकडून आयोजकांना विनंती करण्यात आली आहे ,की असले झेंडे लावू नये तसेच शहरातील ज्या ज्या ठिकाणाहून ही मिरवणूक जाणार आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे हे लावण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

तसेच ही मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने व शांततामय मार्गाने पार पाडण्याच्या सूचना सुद्धा यावेळी पोलिसांकडून आयोजकांना देण्यात आले आहे.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, जुलूस चे सदर प्रमुख, मेहमुद पैलवान कुरेशी, मुनवर लाला, आधीसह मुस्लिम समाज बांधवांची उपस्थिती होती.


Nayi Soch News-e-Hub से और जानें

नवीनतम पोस्ट अपने ईमेल पर प्राप्त करने के लिए सदस्यता लें।

author avatar
इमरान सिद्दीकी

Nayi Soch News-e-Hub से और जानें

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading