राजूर रोडवर अवैधरित्या वृक्ष तोड करणारा ट्रॅक्टर वन विभागाने पकडला; मालक व चालक यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करत ट्रॅक्टर घेऊन फरार झाले.
जालना । वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जालना-राजूर रोडवर अवैधरित्या वृक्षतोडीच्या लाकडाची ट्रॅक्टरमधून वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून एक ट्रॅक्टर पकडला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने मालकास फोन केला. यावेळी मालक व चालक यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करत ट्रॅक्टर घेऊन फरार झाले. दरम्यान, याप्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर मालक ,चालक व अन्य एकाविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.