वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य संदर्भातील जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची बैठक संपन्न
जालना दि. 22 (जिमाका) :- वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य या संदर्भातील जिल्हा कृती आराखडा आखणे तसेच या आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.