मुस्तकीम हमदुले फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिर
जालना/प्रतिनिधी – स्वातंत्र्य दिनानिमित्त मुस्तकीम हमदुले फाउंडेशन, चार्ली ग्रुप, जमीयत- ए- उलेमा जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 ऑगस्ट रोजी जुना जालना भागातील जमजम क्लिनिकमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुस्तकीम हमदुले फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शेख शकील लालमिया यांनी केले आहे.