30 हजाराची लाच मागीतल्या प्रकरणी वकील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

वकीलाविरूध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तक्रारदार यांच्या 498 (अ) अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात पत्नीचा पुरवणी जवाब न नोंदविण्यासाठी व गुन्ह्याचे तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी 30 हजाराची लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून अ‍ॅड. राहुल सांडु भगत (रा.रवी निवास,नारळीबाग,औरंगाबाद) यांच्याविरूध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

वरिल विषयी सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांच्याविरूध्द अंबड पोलिस ठाण्यात 498 अ अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्याचे तपास अधिकारी हे माझ्या परिचयाचे आहे व तपास अधिकारी तुमच्या विरूध्द दाखल गुन्ह्यामध्ये तुमच्या पत्नीचा पुरवणी जवाब न नोंदविण्यासाठी व गुन्ह्याच्या तपासामध्ये सहकार्य करण्यासाठी 30 हजार रूपये लाचेची मागणी केली असे सांगून लोकसेवक हे परिचयाचे असल्याचा प्रभाव टाकून पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रूपये लाचेची मागणी केली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून अ‍ॅड. राहुल सांडु भगत यांच्याविरूध्द अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नेांद करण्यात आला आहे.

सदरील कारवाई औरंगाबाद लाचलुचपत विभागाचे
पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उप अधीक्षक राजीव तळेकर, पोलीस उपअधीक्षक श्रीमती संगीता पाटील, पोह. दिगंबर पाठक, पोअं. अशोक नागरगोजे, विलास चव्हाण, चालक चांगदेव बागुल यांनी केली..