
समृध्दी महामार्गावर ट्रक पलटी,कुत्रा समोरआल्याने चालकाचा ट्रकवरील सुटला ताबा
जालना- समृध्दी महामार्ग चालू झाल्यापासून अपघाताची मालिका थांबता थांबत नाहीये. विशेष म्हणजे भरधाव वाहनासमोर अचानक जनावरे समोर आल्याने अपघात घडत आहेत. आज गुरुवारी दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास समृद्धी महामार्ग नागपूर कॅरीडोर क्रमांक 356 वर ट्रक पलटी होऊन अपघात घडला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दरम्यान, घटनेची माहीती मिळताच महामार्ग पोलीस चंद्रकांत साखरे, कोकणे, एखंडे ई. सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. ट्रक क्रमांक सी जे 04 एल डी 4349 हा तार बंडल घेऊन नागपूर वरून पुणे येथे जात होता. दरम्यान, ट्रक समोर अचानक कुत्रा आल्याने चालकाने ब्रेक लावल्याने ट्रक समृद्धीचे मिडल लाईन मध्ये पलटी झाला. ट्रक चालक सुधीर कुमार सरोज (वय 22) रा. प्रतापगड उत्तर प्रदेश त्यास कुठल्याही प्रकारचा मार लागलेला नाही. ट्रक मिडल लाईन मध्ये पलटी झाल्याने ट्रकचे नुकसान झाले आहे.
