
बाजार गेवराईच्या डॉक्टरने केला महिलेचा अवैद्यरित्या गर्भपात; चार जणां विरुद्ध गुन्हा दाखल
जालना। बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथील एका महिलेचा बाजार गेवराईच्या डॉक्टरने अवैद्यरित्या गर्भपात केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी अवैधरित्या गर्भपात करणारा डॉक्टरसहित महिलेचा पती दोघांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,
सोमठाणा येथील एका विवाहितेच्या पतीने महिलेचे गर्भपात करण्यासाठी गेवराई बाजारच्या डॉक्टरची मदत घेतली आहे. दरम्यान, या महिलेच्या पोटातील तीन ते चार महिण्याचा गर्भचा अवैधरित्या अज्ञात ठिकाणी जाऊन गर्भपात करण्यात आला असून तिला गर्भपात करण्यास तिच्या पतीने संमती दिली. तर डॉ. मनोहर जाधव रा. गेवराई बाजार याने त्यांच्या मित्राच्या सहकार्याने केले आहे. व अज्ञात डॉक्टराने तिचा अवैधरित्या गर्भपात केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्याचे
पोलीस हेड कॉन्स्टेबल जोहरसिंग मलखांबसिंग कलाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महिलेचा पती
(रा. सोमठाणा ता. बदनापूर), डॉ. मनोहर जाधव (रा. गेवराई बाजार), गर्भपात करणारे अज्ञात डॉक्टर व अन्य एका विरुद्ध कलम 312, 315, 316, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि पवार करीत आहेत. अशी माहिती ठाणे अमलदार सहा. फौजदार विलास कांबळे यांनी दिली.
