वाळूच्या भरधाव टिप्पर ची कारला धडक;
दोघे जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

जालना। बदनापूर तालुक्यातील शेलगाव नजीक पांगरी फाट्यावर भरधाव वाळूच्या टिप्परने कारला साईडने धक्का दिल्याने आज रात्री दाहा ते साडेदहा च्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. यात कार मधील दोघेही गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

जालन्याच्या चंदनझिरा येथील दोघे तरुण कारने औरंगाबादहून जालण्याकडे येत होते.बदनापूर तालुक्यातील शेलगाव नजीक पांगरी फाट्यावर भरधाव टिप्परने कार क्रमांक MH 21BF 8018 ला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये कारच्या चुराडा झाला.
या कारमधील धीरज अंभोरे(रा. चंदनझिरा) व विश्वनाथ श्रीधर मेत्रे(रा. सिंदखेड राजा) हे गंभीर जखमी झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे ASI बुणगे , कॉन्स्टेबल कलानी, भगत, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णलयात हलविण्यात आले. मात्र, एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यास डॉक्टरांनी टाके देऊन औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. दरम्यान, धडक देऊन टिप्पर घेऊन चालक फरार झाला आहे.