
जालन्यासाठी हजार कोटीची ऐतिहासिक योजना तत्वतः मंजूर – अर्जुन खोतकर
जालना व बदनापूर विधानसभा मतदारसंघातील गावांसाठी वॉटर ग्रीड योजना मंजुरीसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जालन्याचे पालकमंत्री अतुलजी सावे, अर्जून खोतकर, आ. नारायणराव कुचे, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जैस्वाल, संपर्कप्रमुख पंडीत भुतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

या बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे ओएसडी श्री गजभिये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुख्य कार्यालय मुबंईचे अजय सिंग, छत्रपती संभाजीनगर विभागाचे मुख्यअभियंता श्री लोलापोड, जालना जिल्हा परिषद पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता श्रीमती कानडे, मजीप्रा विभाग जालन्याचे कार्यकारी अभियंता श्री रबडे, जि.प.उप अभियंता श्री बोडखे, उपअभियंता पालकर, श्रीमती देशमुख, शाखा अभियंता श्री पाकळ, कनिष्ठ भूवैज्ञानिक श्री गिरीधर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
