जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी घेतले ताब्यात

सदर बाजार पोलीसांची कारवाई; चार गोरे व तीन रेड्यांची केली सुटका

जालना(प्रतिनिधी)- जनावरांची अवैधरित्या करण्याऱ्या तालुक्यातील मजरेवाडी येथील एकास सदर बाजार पोलिसांनी आज शनिवारी(दि. 4) रोजी सकाळच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून ताब्यात घेतले आहे. बशीर अब्दुल मयुरवाले असे त्याचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी यावेळी अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या चार गोरे व तीन रेड्यांची सुटका केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मजरेवाडी येथील जनावरांची अवैधरित्या वाहतूक करून विक्रीसाठी जात असलेला एक छोटा हत्ती शहरातून जाणार असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यावरून सदर बाजार पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचून जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या बशीर अब्दुल मयुरवाले यांस पकडले.

यावेळी पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 7 हजार 500 रुपये किमतीचा एक लाल रंगाचे शिंगे नसलेला दोन ते तीन वर्ष वयाचा नर जातीचा गोरा, 6 हजार 500 रुपये किमतीचे एक लाल रंगाचे शिंगे नसलेला दोन ते तीन वर्ष वयाचा नर जातीचा गोरा, 8 हजार 500 रुपये किमतीचा एक लाल पांढ-या रंगाचा शिंगे नसलेला दोन ते तीन वर्ष वयाचा नर, 10 हजार रुपये किमतीचे एक काळया रंगाचा शिंगे नसलेला दोन ते अडीच वर्ष वयाचा नर जातीचा गोरा, 7 हजार 500 रुपये किमतीचे एक काळया रंगाचा शिंगे असलेला दोन ते तीन वर्ष वयाचा नर जातीचा रेडा, 6 हजार 500 रुपये किमतीचे एक काळया रंगाचा शिंगे आसलेला दोन ते तीन वर्ष वयाचा नर जातीचा रेडा, 8 हजार 500 रुपये किमतीचे एक काळया रंगाचा शिंगे असलेला दोन ते तीन वर्ष वयाचा नर जातीचा रेडा व वाहतूक करण्यासाठी वापरलेला 1 लाख 50 हजारांचा छोटा हात्ती टाटा एस ज्याचा क्रमांक एम एच-37बी 2224 असा एकुण 2 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दरम्यान, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोना जगन्नाथ आण्णासाहेब जाधव यांच्या फिर्यादीवरून बशीर अब्दुल मयुरवाले व चालक (दोघे रा. मजरेवाडी ता.जि.जालना) यांच्यावर कलम 289 भादवि सह कलम 11(घ) प्राण्याचा छळ प्रतीबंध कायदा 1960 सह कलम 130/177 मोटार वाहन कायदया प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.