वक्फ बोर्डाचा महत्वपूर्ण निर्णय,प्रलंबित मुतवल्लींचे 65 प्रकरण मार्गी,मालमत्तांचा लवकरच विकास होणार…कर्मचारी भरतीचा मार्ग ही मोकळा!!

बोर्ड अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा यांची महत्वपूर्ण माहिती

जालना: महाराष्ट्र वक्फ बोर्डा तर्फे वर्षानुवर्षे प्रलंबित वक्फ संस्थांच्या मुतवल्लींचे तब्बल 65 प्रकरण,169 कर्मचारी पदभर्ती प्रस्ताव तसेच 202 मालमत्तांचे नोंदनीकरण प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.भविष्यात बोर्डाच्या वक्फ जमिनींचा लवकरच विकासही करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर श्री. वजाहत मिर्जा व वक्फ बोर्ड सदस्य समीर काझी यांनी दिली.

नागपूर येथे 11 डिसेंबर रोजी वक्फ बोर्डाची बैठक डॉ.वजाहत मिर्जा यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.यात वक्फ बोर्डाच्या गतिशील प्रभावी व लोकाभिमुख कामकाज व्हावा या साठी आढावा घेण्यात आला.आता संबंधित्यांचा वेळ व पैसा खर्च होऊ नये म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बोर्डाचे शिवीर घेण्यात येणार आहे.जेणेकरून वक्फ संबंधित तक्रारींचा “ऑन द स्पॉट” निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.अशी माहिती अध्यक्ष डॉ.मिर्जा यांनी दिली.या शिवीरात बोर्डाचे जबाबदार सदस्य व अधिकारी उपस्थित राहतील व लोकांच्या तक्रारी व त्यांच्या समस्यांना ऐकून घेण्यात येणार आहे.आम्ही लवकरच शिवीरांचे तारखा जाहीर करू,असे डॉ.मिर्जा म्हणाले.

नागपूर बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे सेंट्रल वक्फ कौन्सिलचे सचिव श्री.शादान जेब खान व तफसीर अहमद यांनी महाराष्ट्रातील वक्फ जमिनींचा भविष्यात मालमत्तांचे संरक्षण व विकास या वर एक ऑनलाइन डेमो सादर केले.या वेळी जमिनींचा विकास करतांना कोणती पद्धत अवलंबवावी यासाठी मुद्देसूद मांडणी सादर केली.

सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षी शासना तर्फे बोर्डाने कर्मचारी भरतीचा प्रस्ताव पाठविला होता,त्यास शासनाने अगोदरच मंजुरी दिली आहे.एकूण 169 अधिकारी,कर्मचारी व चतुर्थ श्रेणीच्या या पदभरती(आर.आर.)आराखड्यास बोर्डाच्या बैठकीत सर्वानुमते हिरवा कंदील दाखविण्यात आला.या महत्वपूर्ण निर्णयाने बोर्डाच्या कामकाजात गतिशीलता येईल,तसेच प्रत्येक जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी मिळाल्याने कामकाज सोयीस्कर होईल.लवकरच कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल,अशी माहिती ही या वेळी श्री.डॉ.वजाहत मिर्जा यांनी दिली.बैठकीत नियम 36 च्या मालमत्तांचे नोंदनिकरण,नियम 43 चे-39, अहवाल बदलाचे -17 प्रस्ताव मंजूर करण्यात आले.बैठकीत एकूण 40 प्रकरण ठेवण्यात आले होते,पैकी बहुतांश मुद्द्यावर सखोल चर्चा करून मंजुरी देण्यात आली.

डॉ.वजाहत मिर्जा

या वेळी बोर्डाचे अध्यक्ष डॉ वजाहत मिर्जा यांच्या बरोबरच खासदार फौजिया खान, हसनैन शाकेर,डॉ मुदस्सीर लांबे, मौलाना हाफिज अथर अली, समीर गुलामनबी काझी तसेच बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद उपस्थित होते.

बोर्डाला अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न-समीर काझी

वक्फ बोर्डाच्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असताना देखील अपेक्षीत असे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे वक्फ लिज रूल 2014 मधील तरतूदीनुसार बोर्डाच्या खुल्या जागा दिर्घ मुदतीसाठी भाडे तत्वाने देवून बोर्डाला अधिक सक्षम करण्याचा व बोर्डाचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यामुळे मालमत्तावर होणारे अतिक्रमणही होणार नाही आणि वादही निर्माण होणार नाहीत.*

समीर गुलामनबी काझी