उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलांवर गुन्हा दाखल करण्याची कॉग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटीलांची मागणी

जालना । महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाउराव पाटील या राष्ट्रीय महापुरूषांविरूद्ध सार्वजनिकपणे अपशब्द वापरून त्यांना अपमानित केल्यामुळे सर्व समाजाच्या जनतेच्या भावना दुःखावल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलां यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कॉग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांना दिले आहे.

याविषयी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असून ते (दि.9)रोजी पैठण येथील संतपिठाचा पहिला दिक्षांत समारंभास प्रामुख्याने उपस्थित होते. त्यावेळी त्यांच्या सोबत जिल्ह्याचे पालक मंत्री संदिपान भुमरे, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व या वेळी व्यासपिठावर वारकरी संप्रदायातील स्थानिक महाराज मंडळीसह इतर मान्यवर व अनेक नागरीक उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रीय महापुरूष महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या राष्ट्रीय महापुरूषांविरूद्ध जानिवपुवर्क त्यांना व समाजाला अपमानित करण्याच्या उद्देशाने असे संबोधित केले की, या “महापुरूषांनी लोकांकडे भिक मागून शाळा चालविल्या ” हि बाब त्यांनी उघडपणे संपूर्ण राज्यातील ईलेक्ट्रॉनिक मिडीया समोर व संपूर्ण जनते समोर सांगितली. तसेच काही दिवसा पुर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील जानिवपुवर्क अपमानीत करणाऱ्यांचा वारंवार देशातील सर्व जनते समोर समर्थन केले. त्यामुळे या महापुरूषांचे अनुयायी, समाजातिल सर्व घटक व समस्त जनतेच्या भावना दुःखावल्या गेल्या आहे. त्यामुळे त्यांच्यावर भा.द.वी.२९४, २९५ व इतर कलमा नुसार तसेच मुंबई/महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ नुसार राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार व चालूप्रचलित कायद्यानुसार व विधीमंडळातील कायदे व निर्देशानुसार तात्काळ कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, राजेंद्र राख, एडवोकेट राम कुराडे, सुभाष कोळकर, राजेंद्र गोरे, अशोक उबाळे, गणेश चांदोडे, अदिंसह इतरांची उपस्थिती होती.