धनतेरस हा आपल्याकडील धनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस-भारूका*

जालना/प्रतिनिधी-* दिवाळी म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा आणि संपन्नतेचा सण, या दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी, धनाचा वर्षाव करणाऱ्या या धनत्रयोदशीला दिपावलीत अनन्यसाधारण महत्व आहे.आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन यांच्याबद्दल आपल्या मनात असलेले प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो, अशी माहिती अध्यात्मिक लेखक तथा लॉयन्स क्लब ऑफ जालना सिटीचे  अध्यक्ष हनुमान प्रसाद भारुका यांनी दिली.

         धनत्रयोदशीचे महत्त्व विशद करताना भारूका म्हणाले की, धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसे व सोने चांदी याची पूजा करून आपली व आपल्या कुटूंबाची प्रगती होत राहावी, अशी प्रार्थना केली जाते. धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटल्या जाते! धनत्रयोदशी हि अश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी असते. मुख्यतः व्यापारी आणि शेतकरी याना हा दिवस खूप महत्वाचा असतो, या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थ बनवले जातात, कुटूंबातील मंडळी एकत्र येतात आणि आनंदानी दिवाळी साजरी करतात, शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायशी संबंधित अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफण, कुदळ, फावडे ,इत्यादी शेतीच्या संबंधीत असलेली सर्व अवजारांची पूजा केली जाते, तर इकडे व्यापारी तिजोरी हिशोबाच्या वह्या सोने नाणे इत्यादीची या दिवशी पूजा करतो.

     चार हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात अमृत कलश दुसऱ्या हातात जळू तिसऱ्या हातात शंख आणि ४ हातात चक्र घेऊन जन्माला आला. या चारही हातातील गोष्टीचा उपयोग करून अनेक व्यादींना रोगांना बरे करण्याचे काम धन्वंतरी भगवान करतो, अशी आख्यायिका आहे. या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात, प्रसाद म्हणून कडू निबाची बारीक केलेली तुकडे आणि साखर असे लोकांना देतात, कडू निबाची उत्पत्ती अमृतापासून झालीय असे मानतात. या दिवशी लोक सोने खरेदी करणे पसंद करतात , या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नत्ती होते, असे मानले जात असल्याची माहिती श्री. भारुका यांनी दिली.

हनुमान प्रसाद भारुका

      या दिवशी भक्तगण गणेश, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि कुबेर यांची विशेष पूजा करतात आणि जीवनात यश मिळवण्यासाठी प्रार्थना करतात. एखाद्या देशाची संस्कृती त्या देशातील सण-उत्सवांवरून ओळखली जाते.   दिवाळीत मातीचे दिवे लावल्याने पूजेचे सिंहफळ मिळते. माती हे मंगल ग्रह आणि तेल शनि हे ग्रहाचे प्रतीक असून मातीचा दिवा लावल्याने ते आनंदी राहतात. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मातीचा दिवा लावल्याने मंगळावर लक्ष देणारे ग्रह प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीवर शिवाची कृपा होते.  नकारात्मकता दूर होते. मातीचा दिवा लावल्याने मानसिक आणि शारीरिक तणाव दूर होतो आणि सकारात्मक उर्जा संचारते. त्यामुळे मातीचा दिवा लावणे हे सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात माती अत्यंत शुभ मानली जाते. म्हणूनच या दिव्याचा वापर अनादी काळापासून होत आहे, अशी माहिती भारूका यांनी दिली.