दिवाळीकरिता सजावटीच्या स्वदेशी वस्तूंना जनतेची पसंती

रंग क्रिएशनची उत्पादने पोहोचली खेड्यापासून ते मेट्रोसिटीपर्यंत

जालना/प्रतिनिधी* – दिवाळीसाठी जालना बाजारपेठ सज्ज झाली. रंगरंगोटीसह गृहसजावट, आकाशकंदील, लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे. गेल्या काही वर्षापासून दिवाळीला गृह सजावटीसाठी स्वदेशी उत्पादनांनाच प्राधान्य दिले जात आहे. जनतेचा कल विचारात घेता विक्रेतेही आपल्या दुकानात स्वदेशी गृहसजावटीच्या वस्तू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. देश-विदेशासह खेड्यापाड्यापासून ते मेट्रोसिटीपर्यंत स्वतः निर्मित केलेली गृह सजावटीची उत्पादने पोहचविणाऱ्या जालना येथील युवा उद्योजिका तथा रंग क्रिएशनच्या संचालिका सोनम गजेंद्र भारूका स्वदेशी या संकल्पनेचाच अंगीकार करत आहेत. जालना शहरातील शोला चौक परिसरातील नया बाजार या ठिकाणी असलेल्या दालनात आकाश कंदील,तोरण, शुभ लाभ, मातीचे दिवे, रांगोळी, लक्ष्मीची पावले, चटई, लटकन तसेच गृह सजावटीचे इतर साहित्य आकर्षण ठरत आहे. 

     रंग क्रिएशनची उत्पादने आरसी ब्रँड या नावाने देश विदेशात निर्यात होत आहे. सोबतच लग्न सोहळ्यासाठी लागणारी सर्व साहित्याचीही रंग क्रिएशन निर्मिती करत आहे. वाढती मागणी पाहता, किरकोळ बरोबरच होलसेल विक्रीही केली जात आहे. सोनम भारूका म्हणाल्या की, आम्ही गृहसजावटीच्या सर्व वस्तू स्वतः तयार करतो. गेल्या 8 वर्षांपासून रंग क्रिएशनच्या माध्यमातून गृह सजावटीचे साहित्य निर्मितीचे काम सुरु केलेले असून, त्यात चांगली प्रगती करत इतर महिलांनाही प्रेरित करत आहोत. रंग क्रिएशननिर्मित साहित्यांना आता परदेशातही मागणी होऊ लागली आहे. टेक्सास, कॉलिफॉर्निया, लंडन, जर्मनी, युके, युएस या देशातूनही आम्हाला ऑर्डर मिळत आहेत.  जालना जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापासून ते मुंबई, पुणे, वर्धा, नागपूर, परराज्यातील जयपूर, छत्तीसगड, दिल्ली, आमदाबाद, कर्नाटक या मेट्रोसिटीपर्यंत रंग क्रिएशनची उत्पादने जात आहेत. 25 मेट्रो  सिटीमध्ये आमचे डीलर आहेत.  आरसी ब्रँड या नावाने आमची उत्पादने लौकिकास पात्र ठरत आहेत.

      दिवाळीसाठी तयार केलेले खास आकाश कंदील जनतेच्या पसंतीला उतरले असून, यंदा 250 आकाश कंदील खास मागणीनुसार देश-विदेशात पोहोचले आहेत. स्टार टीव्हीवरील पांड्या स्टोअर्स या प्रसिद्ध मालिकेतील एक्टर रजनी गुप्ता यांच्या हस्ते आरसी ब्रँडच्या उत्पादनांचा प्रोमो झाला असून, त्यांनी दिवाळीला या उत्पादनाचा ग्रह सजावटीसाठी वापर करून, स्वदेशी बनावटीच्या उत्पादनाचा वापर करावा या संदेशाचा व्हिडिओ व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सौ. सोनम गजेंद्र भारुका यांनी आम्ही स्वदेशी सजावट वस्तू निर्माण करून विक्री करतो. घरगुती आर्टवर्क, शुभ कार्यासाठीचे सजावट साहित्य, सजावटीच्या वस्तू आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. ऑनलाइन, डिजीटल, फेसबूक आदी माध्यमातून जनतेपर्यंत पोहचलो आहोत. सजावटींच्या वस्तू आम्ही आतापर्यंत 200 पेक्षा अधिक होलसेल व्यापाऱ्यांपर्यंत  पोहचविल्या आहेत. जालन्यातील  महिला घर-परिवार सांभाळतानाच स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करू लागल्या आहेत, ही समाधानाची बाब आहे. अनेकजण मेट्रोसिटीमध्ये गृहसजावट वस्तू खरेदीसाठी जातात. मात्र, त्याच वस्तू जालना येथे निर्मित होत असून, त्या वस्तू तिकडे जावून जास्त दराने खरेदी करण्याऐवजी जनतेने स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीही होईल. आम्ही सुमारे दहा जणांच्या हाताला काम देऊन त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिल्याचे आत्मिक समाधान लाभत आहे, असे सांगून रंग क्रिएशनच्या दालनाला जालनेकरांनी अवश्य भेट देऊन आमचा उत्साह वाढवावा, असे आवाहन  सौ. सोनम भारुका यांनी केले आहे.